किस्सा किमान पंधरा वर्षांपूर्वीचा. एक कॉलेज ग्रुप, वेगवेगळ्या शहरातून आलेली मुले-मुली आणि त्यांच्या गप्पा. विषय दारू पिण्याचा सुरू होता आणि बोलता बोलता एका मुलीने सांगून टाकले. ‘मै और मेरे पप्पा साथ बैठकर ही पिते है’. काही जणांसाठी हा बॉम्ब होता, काही जणांसाठी शॉक. विशेषतः लहान गावांमधून आलेल्यांसाठी जरा जास्तच. आणि तेवढ्यात एक टिपिकल मराठी घरातून आलेली मुलगी बोलून गेली, ‘मी पण पिते कधी कधी’. आता एकंदर तिच्या आर्विभावावरून सगळ्यांच्याच लक्षात आले होते की हे फक्त सांगण्यासाठी आहे आणि प्रत्यक्षात काहीच नाही. पण, तिच्या मनात काय चालले असेल याचा अंदाज त्यातून येत होता. मुली दारू पितात की नाही किंवा का पितात हे सांगण्यासाठी हा किस्सा बराचसा प्रातिनिधिक आहे.
आज पंधरा वर्षांनंतर परिस्थिती बदलली आहे. मुलींचे दारू पिणे आता अप्रूपाचे राहिलेले नाही. तरीसुद्धा वरच्या किश्श्यातील मानसिकताच प्रामुख्याने सर्वत्र आढळते. मित्र-मैत्रिणींच्या ग्रुपमध्ये आपण ‘मागास’ वाटू नये, या भावनेपोटी अनेक मुली दारू पिण्यास सुरुवात करतात. आता याला काही ‘श्रीगणेशा करणे’ म्हणता येणार नाही, पण सुरुवात होते ती मित्र-मैत्रिणींच्या प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष दबावातूनच. या व्यतिरिक्त मुली आणि महिला का, केव्हा, कुठे, कधी, कोणती दारू पितात याची विविध कारणे आहेत. वीस वर्षांपूर्वी फक्त मोठ्या शहरांमध्ये असलेल्या पद्धती आता नव्याने मेट्रो होऊ बघणाऱ्या लहान शहरांमध्येही रुजू लागल्या आहेत. रुळल्या आहेत. मुलगा/मुलगी हा भेदाभेद आता इथेही राहिलेला नाही, दारू प्रकृतीसाठी हानीकारक असली तरी!
मुलींच्या दारू पिण्यामागे तथाकथित उच्चभ्रू जीवनशैलीची असोशी ही सर्वच वयोगटांमध्ये दिसून येते. याच जीवनशैलीचा भाग म्हणून आयुष्यात दारूचा प्रवेश होतो आणि मग त्याची सवय होते. लहान ठिकाणांहून आलेल्या, कमावत्या झालेल्या आणि हातात पैसा खुळखुळत असलेल्या मुली उत्सुकता म्हणून सुरुवातीला दारूची चव घेतात. किंबहुना, मुलांप्रमाणेच सगळे ‘शौक’ करता आले पाहिजे, ही उत्सुकताच अनेकींच्या आयुष्यात या व्यसनाचा प्रवेश करविते. कधी ग्रुपबरोबर तर कधी बॉयफ्रेंडबरोबर मग मद्यप्राशन सुरू राहते आणि हळूहळू अंगवळणी पडते. त्यातही केवळ दारू पिण्यापुरता हे मर्यादित नाही तर याचा संबंध पब आणि पार्टी कल्चरशी जास्त आहे. मॉडर्न अॅपेरल्स आणि अॅक्सेसरीज असताना दारू पिण्याचा ‘मॉडर्न’ अॅटिट्युडही अंगवळणी पाडला जातो. आणि केवळ मुलीच का, अनेक महिलांची दारू पिण्याची सुरुवातही नवऱ्याबरोबर झाली असल्याचे दिसून येते. कधी कॉर्पोरेट तर कधी उच्च जीवनशैलीचा भाग म्हणून तर कधी दोघांनी कधीतरी एन्जॉय करावयाचे म्हणून दारू प्यायली जाते. नंतर नंतर त्याची सवय होते आणि मग तर महिलांची ही सवय सोडविता सोडविता नवऱ्यांच्याही नाकी नऊ आल्याची उदाहरणे आहेत.
दरम्यान, दारू पिण्याला बंधमुक्त जीवनाचा संदर्भही तथाकथित सामाजिक चळवळीतून नकळत जोडला गेला. मुली-महिलांनी आर्थिकदृष्ट्या स्वयंपूर्ण होणे आणि शिक्षित होणे यासाठी चळवळी झाल्या आणि त्या योग्यच होत्या. पण, हे करता करता दारू किंवा ड्रग्ज यांचाही संबंध अप्रत्यक्षपणे मुलींच्या मुक्त जगण्याबरोबर जुळविला गेला. ‘रिबेल’ आधुनिक नायिका दाखवायची म्हणून चित्रपटातून ती दारू रिचविताना दाखविली जाऊ लागली. स्त्री-मुक्तीचे बऱ्यापैकी उथळ सांकेतिकीकरण करणारे हे चित्रण वैयक्तिक आयुष्यात उतरले नसते तर नवलच. त्याची उदाहरणे आजूबाजूच्या समाजात दिसत आहेतच.
बाय द वे, मुली नेमक्या काय पितात, हा प्रश्नही उत्सुकतेचा असतो. सामान्यतः रम, व्होडका, जिन, टकिला आणि विशिष्ट पार्टीत वाइन याभोवती साधारणतः मुली-महिलांचे मद्यजीवन ‘घुट’मळत असते. कधीतरी बीअर किंवा मग साहसाची फारच आवड असेल तर इतर प्रकारांकडे मोर्चा वळतो. व्होडका हा मुलींमध्ये पॉप्युलर आहे, असे म्हणता येईल. असो. कामाचा ताण आहे म्हणून जसे पुरूष दारू पितात तेच कारण देत मुलीही कॅन्स आणि पेग्ज पोटात ढकलत असतात. ताण हा आधुनिक जीवनशैलीचा भाग आहेच. त्यामुळे तो हाताळण्यासाठी काही लोक जसे पंचकर्म किंवा योगाचा आश्रय घेतात तितक्याच सहजपणे काही जणांना दारूचा आसरा घ्यावा वाटतो. अनेक मुलींच्या दारू पिण्यामागे हेही कारण आहे. वेगवेगळ्या प्रकारच्या ड्रग्ज सेवनासाठी सोबत म्हणून मग दारू घेतली जाते, अशीही अनेक उदाहरणे आढळून येतात.

इंटरनेटवर धडे दारू पिण्याचे
दारू पिण्याचे शास्त्रशुद्ध धडे देण्याची सर्व साधने इंटरनेटवर उपलब्ध आहेत. विविध व्हॉट्स अॅप ग्रुप, फेसबुक पेजेस यावर कोणती दारू केव्हा, कशी, किती प्यावी याचे सर्व प्रकारचे मार्गदर्शन मिळते. हे सांगणाऱ्या स्वतंत्र वेबसाइट्स उपलब्ध आहेत. एकदा तुम्ही त्या वर्तुळात गेले की दारू आणि इतर मादक पदार्थांबद्दल सर्व प्रकारची माहिती देणारे अनेक ‘विकिपिडिया’ या आभासी जगात उपलब्ध आहेत. या सगळ्यांच्या मदतीने मुलींचे उच्च शिक्षण आणि दारू पिण्याचा प्रवास सुरू राहतो.

हे तर ‘स्टाइल स्टेटमेंट’
आपल्याकडे दारू न पिणारा हा ‘मागास’वर्गीय समजला जाऊ लागला त्याला आता दशकभराचा कालावधी उलटला आहे. मुलींच्या दारू पिण्यामागेही बहुतांश वेळा हेच ‘स्टाइल स्टेटमेंट’ आहे. या विषयावर मुलींशी किंवा त्यांच्या गोतावळ्यातील मुलांशी बोलल्यास हे अधिकच स्पष्ट होते. विशेषतः नव्याने मोठ्या होऊ लागलेल्या शहरांमध्ये तर हे जास्तच लागू होते. आपण किती कूल आहोत, हे सांगण्यासाठी मुलींना दारू प्यावीशी वाटते आणि ती प्यायला जाते, हे चित्र थोड्या फार फरकाने सगळीकडे सारखे आहे. आणि म्हणूनच, दारूच्या दुकानांमधून दारू नेणाऱ्या मुली हे चित्र सर्रास दिसू लागले आहे. हुक्का पार्लरवर पोलिसांची धाड पडली की हमखास मुली आढळतात आणि त्यांनी दारू प्यायली असते, हे वास्तव आहे. बंधमुक्त जीवनशैली आणि तथाकथित क्रांतीचे चित्र रंगविल्यानंतर दारू तुम्हाला वेगळ्या जाळ्यात अडकवत नेते. कॉलेजेस, बार, हुक्का पार्लर, कट्टे, लाऊंज यांच्यापासून ते दिवाणखाना आणि शयनगृहापर्यंत अनेक ठिकाणी हे चित्र आणि त्यातील वास्तवच गडदच होत चालले आहे.

आणि म्हणून दारू पितो...
- मित्रांबरोबर राहून दारू पिणे सुरू झाले. आता दारूची भीती वाटत नाही. अनेकदा ग्रुपमधील मुलांकडूनच दारू मागविली जाते.
- सवय लागल्याने रोज दारू प्यायला जाते.
- घरापासून दूर, वसतिगृह, स्वतंत्र खोल्यांमध्ये राहणाऱ्या मुलींमध्ये जास्त प्रमाण.
- मुलींच्या नकळत मित्र त्यांना मादक पदार्थ देतात. त्यात दारू आलीच.
- ‘कूल’ आहोत हे दाखविण्यासाठी.
- टेन्शन कमी करण्यासाठी. जे कामामुळेही येते आणि ब्रेकअपमुळेही.

No comments:
Post a Comment